देशभरातील भूमीहिनांचे सर्व्हेक्षण करूनपुन्हा भूदान चळवळ उभारण्याची गरज – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

भुवनेश्वर दिनांक ११ – देशभरात भुमिहिनांची संख्या मोठी आहे. देशभरात सर्व राज्यांतील भूमिहीनांचा सर्व्हे शासनाने कारणे आवश्यक आहे.देशभरातील भूमिहीनांना कसण्यासाठी भूमी देण्याची गरज आहे. आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक भूदान चळवळीची पुन्हा देशाला गरज आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली.
भुवनेश्वर मध्ये जयदेव भवन येथे भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांच्या 130 व्या जयंती निमित्त विकसित भारता साठी भूदान आंदोलनाचे योगदान या विषयावर आयोजित राष्ट्रिय परिसंवादात ना. रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.यावेळी विचारमंचावर माजी केंद्रीय मंत्री ब्रीज किशोर त्रिपाठी ;ओरिसा चे उच्च शिक्षण मंत्री सुर्यवंशी सुरज; आमदार रामचंद्र कदम; रिपब्लिकन पक्षाचे ओरिसा अध्यक्ष अब्दुल वली; आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर चे अध्यक्ष kalicharan सिंग;विनोबा सेवा प्रतिष्ठान चे सरचिटणीस मनोज जेना; लोकसेवक मंडळ चे उपाध्यक्ष दीपक मालवीय; शंकर कुमार सन्याल; आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आचार्य विनोबा भावे यांना आपण 1979 मध्ये वर्धा येथे सेवाग्राम आश्रमात भेटलो होतो त्यांच्या भूदान चळवळीचा आम्हाला अभिमान असल्याचे आपण त्यांना सांगितले होते.ज्यांच्याकडे अतिरिक्त जमीन आहे त्यांनी त्यातील काही जमीन भूमिहीनांना आनंदाने दिली पाहिजे.त्यासाठी सेवाभाव आवश्यक आहे. आचार्य विनोबा भावे हे महात्मा गांधी यांनी निवडलेले पाहिले सत्याग्रही होते.त्यांच्या सरख्या महान विभुतीमुळे भूदान चळवळ देशात यशस्वी झाली.भूदान चळवळीतून 30 लाख एकर जमीन गरीब भूमिहीनांना दान मिळाली.त्यामुळे आज पुन्हा देशभरातील भूमिहीन गरिबांचे सर्व्हेक्षण केले पाहिजे.पुन्हा आचार्य विनोबा भावे यांचा आदर्श घेऊन ऐतिहासिक ठरलेल्या भूदान चळवळीला पुन्हा सुरुवात केली पाहिजे.पुन्हा भूदान चळवळ सुरू करणे हीच खरी आचार्य विनोबा भावे यांना श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन ना. रामदास आठवले यांनी केले.
