डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून कठोर शिक्षा करा -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

*अमृतसर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट देऊन केले अभिवादन*
अमृतसर दि.29- अमृतसरमधील सुवर्ण मंदिरापासुन जवळ असणाऱया महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचा आम्ही तिव निषेध करित आहोत.या प्रकरणी अटक केलेल्या माथेफीरु आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी.देशद्रोहा सोबत राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम (एन एस.ए)नुसार या आरोपीवर कार्यवाही करावी.अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.अमृतसरमधील पुळा विटंबनेची घटना घडली.त्या ठिकाणी ना.रामदास आठवले यांनी भेट देऊन घटनास्थळाची पहाणी केली. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास त्यांनी विनम्र अभिवादन केले. अमृतसरमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होण्याच्या घटनेस पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान जबाबदार आहेत. आप चे नेते अरविंद केजरीवाल हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल फक्त मोठ्या गप्पा मारतात.प्रत्यक्ष मात्र पंजाबमधील आप सरकारचे अमृतसरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या सुरक्षेकडे पूर्ण दुर्लक्ष झाले होते.पंजाबमध्ये दलितांची संख्या मोठी आहे.त्यांच्या बळावर मुख्यमंत्री झालेले आप चे भगवंत मान यांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही.अमृतसरमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या दुर्घटनेची जबाबदारी स्विकारुन मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे. अमृतसरमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची विटंबना झाल्याचे कळताच अमृतसर,जालंधर,लुधियाणा आदी ठिकाणी दलित बहुजनांनी बंद पुकारुन हायवे जाम केले होते.रिपब्लिकन पक्षातर्फे ना.रामदास आठवले यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला होता.आज ना.रामदास आठवले यांनी अमृतसरमध्ये भेट देऊन घनटास्थळाची पाहणी केली.तसेच गुरुनानक युनिव्हर्सीटी येथे या बाबत शासकीय बैठक घेऊन प्रकरनाची पूर्ण माहिती घेतली.या बैठकीत अमृतसरचे जिल्हाधिकारी साक्षी सोहनी,पोलिस आयुक्त गुरुप्रित भुलर,मनपा आयुक्त गुलप्रितसिंग अवलख आदी अधिकारी उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अमृतसरमधील पुतळा विटंबनेतील आरोपीचे नाव आकाशदिप असुन तो 24 वर्षांचा आहे.मोघा जिल्हातिल धरमकोट येथील चुंगा बस्तीत राहणारा मजुर आहे.तो 3 वर्ष अबुधाबीत काम करुन तो गेल्या वर्षी अमृतसरला आला.त्याने प्रजासत्ताकदिनी 26 जानेवारी ला दुपारी 3 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर हातोड्याने प्रहार करण्याचा प्रयत्न केला.तेथील संविधान पुस्तीकेचा ही जाळून अवमान केला.महामानवच्या पुतळ्याच्या विटंबनेचा हा अत्यंत निंदनीय संतापजनक प्रकार आहे.या प्रकरणी 26 जानेवारी रोजी सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी लावण्यात आलेली शिडी का काढण्यात आली नाही.प्रजासत्ताकदिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर पोलिस बंदोबस्त का नव्हता याबाबतचा प्रश्न ना.रामदास आठवले यांनी अधिकाऱयांना विचारला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या संरक्षणाची पुरेपुर जबाबदारी पोलिस आणि प्रशासनाने घेऊन सुरक्षेचे उपाय योजन्याचे निर्देश ना.रामदास आठवले यांनी दिले.