केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले येत्या दि.१९ आणि २० एप्रिल रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं सोबत वर्धा,नांदेड आणि परभणी येथील प्रचार सभांना संबोधित करणार

मुंबई दि.17-रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे येत्या दि.19 आणि 20 एप्रिल रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोबत वर्धा,नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदार संघात महायुतीच्या प्रचार सभांना सबोधित करणार आहेत.भाजप प्रणित महायुतीच्या सर्व उमेदवारंना ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाचा जाहिर पाठिंबा देण्यात आलेला आहे.अबकी बार चारशे पार चा नारा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातुन महायुतीचे 45 पेक्षा जास्त खासदार निवडूण देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष सुध्दा कंबर कसून महायुतीच्या प्रचाराला लागला आहे.
परभणी लोकसभा मतदार संघात रासप चे अध्यक्ष आणि महायुतीचे उमेदवार महादेव जाणकर यांच्या प्रचारासाठी दि.20एप्रिल रोजी प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांच्या सोबत ना.रामदास आठवले परभणीत प्रचार सभेला संबोधित करणार आहेत.दि.19 रोजी वर्धा मतदार संघाचे भाजप प्रणित महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी वर्धा येथे आयोजित केलेल्या जाहिर सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोबत ना.रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.20एप्रिल रोजी नांदेड येथे ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोबत भाजप महायुतीचा ना.रामदास आठवले प्रचार करणार आहेत.