राजकीय

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आरपीआय हीच आमची माय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

*देशभरातील दलितांच्या राजकीय चळवळीचे आरपीआय हेच मातृस्थान*

मुंबई/हैद्राबाद दि.4 – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतुन स्थापन झालेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष देशभरातील दलितांच्या राजकीय चळवळीचे मातृस्थान आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आर. पी. आय. हीच आमची माय आहे.त्यामुळे शरिरात रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत आम्ही देशभरात रिपब्लिकन पक्ष मजबूत करीत राहू असा निर्धार रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना .रामदास आठवले यांनी केला.हैद्राबाद तेथे फायनांस सिटी येथे रिपब्लिकन पक्षाच्या खिश्चन मायनॉरेटी आघाडी च्या वतीने आयोजित जाहिर सभेत ना.रामदास आठवले बोलत होते. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील; संविधानातील समतावादी भारत साकारण्याचा संकल्प करणारी जाहिर सभा रिपब्लिकन पक्षाच्या खिश्चन आघाडी तर्फे आयोजित करण्यात आली होती.त्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणुन ना.रामदास आठवले बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे आयोजक खिश्चिन आघाडीचे प्रमुख जॉन मसकु उपस्थित होते.जॉन मसकु यांनी या कार्पामांचे अत्यंत शानदार आयोजन केले होते.यावेळी शेकडो रिपाइं कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी निळे टी शर्ट आणि संपूर्ण हैद्राबाद मध्ये निळे झेंडे; स्वागताचे बॅनर लावून हैद्राबाद शहर आणि येथील फायन्साशल सिटी निळ्या झेड्यांनी निळी-निळी झाली होती.हैद्राबाद शहर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी रिपब्लिकनमय करुन टाकले होते.याबद्दल ना.रामदास आठवले यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी विचार मंचावर जॉन मसकु,परमशिवा नागेश्वरराव गौंड,ब्रम्हामानंद रेड्डी,तेलंगणाचे अध्यक्ष रवि पसुला,गोरखसिंग,रत्नप्रसाद,स्नेहलता,रोजाराणी,पुष्पा गंगा; लता आदि रिपब्लीकन नेते विचारमंचावर उपस्थित होते.यावेळी विविध समाजातील लोकांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला.मोठ्या संख्येने रिपब्लिकन कार्यकर्ते उपस्थित होते. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे परिपूर्ण आणि जागतील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात संसदीय लोकशाही मजबुतीने उभी केली आहे.जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही भारत देशात नांदत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अपार ज्ञानामुळे भारतात संसदीय लोकशाही यशस्वी झाली आहे असे प्रतिपादन यावेळी ना.रामदास आठवले यांनी केले.रिपब्लिकम पक्ष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची निशाणी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतुन रिपब्लिकन पक्ष साकार झालेला आहे. रिपब्लिकन पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात आम्ही पोहोचवत आहोत.सर्व जाती धर्मियांना रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आम्ही जोडत आहोत.रिपब्लिकन पक्षावर आम्ही आमच्या आई प्रमाणे प्रेम करित आहोत. या देशातील दलित अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडवण्यसाठी; या देशातील जनता रिपब्लिकन पक्षावर पूर्ण विश्वास टाकेल.एक दिवस रिपब्लिकन पक्षाची या देशावर सत्ता येईल . त्यादृष्टीने रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी काम करावे असा बुलंद विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

Star Maharashtra

Star Maharashtra या न्यूज वेबसाईटवर प्रसिद्ध होणाऱ्या मजकूर, बातम्या, जाहिराती, व्हिडिओ, फोटो यातील मतांशी संपादक / वेबसाईट संचालक सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!