सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची बीड येथे भेट

मुंबई दि.30 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले आज बीड आणि परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत.या दरम्यान आज सकाळी बीड शासकीय विश्रामगृह येथे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ना.रामदास आठवले यांची सदिच्छा भेट घेतली.बीड मधील मस्साजोग या गावातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला आहे.मस्साजोग मधील सरपंचाची हत्या ही माणुसकीची हत्या झाली आहे असे सांगत ना.रामदास आठवले यांनी या निर्घृण हत्येचा तीव्र निषेध केला आहे. आज या प्रकरणी ना.रामदास आठवले यांनी बीड चे जिल्हा अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन प्रकरणाची माहिती घेतली.त्यानंतर आज सकाळी 11 वाजता मस्साजोग या गावी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि बीड जिल्हा अध्यक्ष पप्पू कागदे; राज्य कार्याध्यक्ष बाबूराव कदम; मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके आणि मस्साजोग चे रहिवासी मुंबईतील रिपाइं चे कार्यकर्ते महावीर सोनवणे उपस्थित होते.