
मुंबई दि.24 – सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी घटना आहे.या हत्याकांड व खंडणी प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करुन या प्रकरणाचा तपास जलद करावा यासाठि केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेणार आहे.असे रिपब्लिकन पक्षाने राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना .रामदास आठवले यांनी सांगितले.ना.रामदास आठवले यांनी आज मस्साजोग येथे सरपंच देशमुख यांच्या कुंटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम; बीड जिल्हा अध्यक्ष आणि रिपाइं चे युवक आघाडी चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे ; मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके ; महावीर सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचा लहान भाऊ धनंजय तसेच दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या मातोश्री तसेच त्यांची पत्नी आणि परिवार जण यावेळी यांच्याशी ना.रामदास आठवले यांनी सांत्वनपर चर्चा करताच त्यांच्या दुःखाची धारा डोळ्यांतून वाहू लागल्या.मारेकऱ्यांना मीच जाऊन मारावे अशी अशी तीव्र संतप्त भावना सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी ने व्यक्त केल्या. दिवंगत सरपंच संतोष देशमुख अत्यंत लोकप्रिय आणि सर्वांना मदत करणारे व्यक्तिमत्व होते त्यांची हालहाल करून झालेली हत्या म्हणजे माणुसकीची हत्या आहे.मानवतेला कलंक फासणाऱ्या या प्रकरणातील सर्व आरोपींना त्वरित अटक झाली पाहिजे. याप्रकरणी बळी गेलेल्या सरपंचाच्या कुटुंबियांची कोणतीही जबानी पोलिसांनी का घेतली नाही याकडे ना.रामदास आठवले यांनी सर्वांचे लक्ष वेधले असून या प्रकरणी रिपब्लिकन पक्ष दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी असून या प्रकरणी न्याय मिळे पर्यंत आपण देशमुख परिवाराच्या पाठीशी मजबूत उभे राहू असे ना.रामदास आठवले म्हणाले.नंतर माध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले या भागात सौर ऊर्जा प्रकल्पाच्या गावातीलच बौद्ध दलित सुरक्षा रक्षकाला झालेल्या मारहानी प्रकरणी पोलिसांनी अॅट्रासिटीची तक्रार वेळीच दाखल करुन घेतली असती तर कदाचित सरपंच हत्येची घटना टाळता आली असती.याप्रकरणी मस्सा जोग ग्रामस्थ आणि बीड जिल्ह्यातील रहिवसियांच्या भावना तीव्र संतप्त आहेत.दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांना आपण न्याय मिळवून देऊ असे ना.रामदास आठवले म्हणाले.