देशाच्या विकासासाठी मोदींच्या नेतृत्वातील एन डी ए हाच समर्थ पर्याय — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.11 – प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी हे विकासाची दूरदृष्टी असणारे मजबूत जनाधार असणारे नेते आहेत. विश्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारत देश जगात विविध क्षेत्रात पुढे आलेला आहे.विविध क्षेत्रात आपला देश प्रगती करीत आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रधान मंत्री मोदींच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एन डी ए ) हाच देशा समोर समर्थ पर्याय आहे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले. गोंदिया जिल्ह्यातील असोली गावात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भाजप रिपाइं महायुती चे भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ना. रामदास आठवले बोलत होते.
नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी सुनील मेंढेना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन ना. रामदास आठवले यांनी यावेळी केले.यावेळी रिपाइं चे राजेंद्र रामटेके; अशोक घोटेकर; विजय आगलावे: बाळू घरडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रधानमंत्री मोदींनी अनेक योजना देशात राबवल्या.विविध योजनांचा गावागावात लाभ पोहोचवला आहे. त्यामुळे तिसऱ्या वेळेस जनता मोदींच्या नेतृत्वात एन डी ए लाच विजयी करेल.असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
गोंदिया भंडारा चंद्रपूर भद्रावती गडचिरोली नागपूर रामटेक आदी विदर्भातील जिल्ह्यांत ना. रामदास आठवलेंनी जाहीर सभा घेऊन भाजप महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. आंबेडकरी जनतेने ; रिपब्लीकन कार्यकर्त्यांनी भाजप महायुती ला साथ देऊन काँग्रेस इंडिया आघाडीचा पराभव करावा असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले आहे .