
मुंबई दि.13- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्त उदया रविवार दि.14 एप्रिल 2024 रोजी दुपारी 2 वाजता मुंबईत चैत्य भुमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले विनम्र अभिवादन करणार आहेत.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या दि.14 एप्रिल 2024 रोजी सकाळी दिल्लीत त्यांच्या 11 सफदर जंग रोड निवास स्थानी
भिमजयंती उत्सव निमित्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत.नवी दिल्लीत संसदेच्या प्रांगणात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला ते अभिवादन करणार आहेत.त्यानंतर ते दिल्लितुन मुंबई कडे रवाना होणार आहेत. दि.14 एप्रिल 2024 रोजी दुपारी 2 वाजता मुंबईत,दादर चैत्यभुमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना रामदास आठवले विनम्र अभिवादन करणार आहेत.