संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही जीव द्यायलाही तयार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई / बेगलुरू दि.15- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान कोणी ही बदलु शकत नाही.जे बदलण्याचा प्रयत्न करतील त्यांचा जीव घ्यायला आणि संविधानाच्या रक्षणासाठी जीव द्यायला आमची आंबेडकरी जनता तयार आहे.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी कोलार(कर्नाटक) येथे केले.कोलार मधील मलगंनहाल्ली या गावात भगवान गौतम बुध्द,सम्राट अशोक, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,म्हैसुर महाराज नालवडी कृष्णराज वडीयार यांच्या पुतळ्याचे उद्घाटन ना.रामदास आठवले यांच्या हस्ते झाले.रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व्यंकट स्वामी यांच्या अध्यक्षतेत आयोजित या कार्यक्रमाचे संयोजन रिपब्लिकन पक्षाच्या कर्नाटक राज्य शाखा आणि समता सैनिक दला तर्फे करण्यात आले होते.यावेळी बौध्द भंते माता बुध्दंम्मा रिपाइं चे आर पी सतिष,रुपकला,ए बी होसमनी,दिलशाद तहसिलदार, रिपाइं चे युवक आघाडी कोलार(के जी एफ) जिल्हा अध्यक्ष बॅट मन ,तसेच आंध्रप्रदेश चे अध्यक्ष ब्रम्हानंद रेड्डी,परमशिवा नागेश्वरराव गौड, गोरखसिंग आदी मान्यवर उपस्थीत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आणि संविधानाचे रक्षण करणारे नेते आहेत.विरोधी पक्षाने त्यांच्या विरोधात निवडणुकीत खोटा प्रचार केला.संविधान बदलण्याच्या नावाने दलितांची दिशाभुल केली.संविधानाला कोणताही धोका नाही.जे संविधान बदलण्यचा विचार करतील त्यांचा सत्यानाश होईल.ज्यांना संविधान मान्य नसेल त्यांना या देशा बाहेर हाकलुन लावू. 25जुन 1975रोजी तंतकालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात लावलेली आणिबाणी हा संविधानावरील हल्ला होता.असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले.
