डॉ बाबासाहेब आंबेडकर संकल्प भूमी स्मारक कामाची केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पाहणी

मुंबई दि.19 – बडोदा येथील सयाजी गार्डन मध्ये ज्या वृक्षाखाली महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारण आणि दलितोध्दाराचा संकल्प केला त्या स्थळाला देशभरातील आंबेडकरी जनता संकल्पभूमी म्हणून अभिवादन करते.आज या ऐतिहासीक संकल्पभूनी ला आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी भेट दिली.येथे बाजूला काही अंतरावर सयाजी गार्डन जवळ गुजरात सरकार तर्फे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर संकल्पभूमी स्मारक 26 कोटी खर्च करून भव्य स्तुप अकारात निर्माण करण्यात येत आहे.त्या स्मारक कामाची पाहणी आज ना.रामदास आठवले यांनी केली .हे स्मारक काम लवकर पूर्ण होत असून येत्या 14 एप्रिल भीम जयंती पर्यंत या संकल्प भूमी स्मारकाचे लोकार्पण होईल अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली.बडोदा येथे उभ्या राहत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संकल्पभूमी स्मारकाचे काम मार्गी लावल्याबद्दल गुजरात चे मुख्यमंत्री भूपेंद्र यादव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ना.रामदास आठवले यांनी आभार मानले आहेत.देशभरातील आंबेडकरी जनता बडोदा येथील संकल्प भूमी भेट देतात .संकल्प भूमी येथे भव्य स्मारक उभारावे ही गरज ओळखून गुजरात सरकार ने संकल्प भूमी येथे भव्य स्तूप उभारून स्मारक उभारले आहे .प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात अनेक ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची भव्य स्मारक उभारली जात आहेत.याचा आम्हाला अभिमान आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले .यावेळी रिपब्लिकन पक्षाचे गुजरात प्रदेश अध्यक्ष अशोक कुमार भट्टी; गुजरात प्रभारी जतिन भुटटा; लीलाबेन वाघेला; राजेंद्र टाक; राजेश गोयल आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
