Uncategorized
संघर्षनायक नामदार रामदास आठवले यांचा वाढदिवस सहकुटुंब दुबईत मरिना बिचवर साजरा….

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले साहेब सहकुटुंब दुबई दौऱ्यावर असून २५ डिसेंबरला त्यांच्या वाढदिवसा निमित्त दुबई मधील मरिना बीच वर ना.रामदास आठवले यांचे त्यांच्या पत्नी सौ.सीमाताई आठवले यांनी औक्षण करून अभिष्टचिंतन केले.सोबत त्यांचा सुपुत्र कुमार जित आठवले उपस्थित होते. लाडका सुपुत्र जित आणि पत्नी सौ.सिमाताई आठवले यांच्या सोबत दुबई मरीना बीच वर ना.रामदास आठवले यांनी सहकुटुंब आपला वाढदिवस साजरा केला.वाढदिवसा निमित्त ना.रामदास आठवले यांना देशभरातून आणि जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.त्यांनी आपला वाढदिवस असल्याचे दुबईत कुणालाही सांगितले नाही मात्र तरीही तेथे ना.रामदास आठवले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
