दक्षिण भारतात ही नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाचा करिष्मा दिसेल- केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले

कन्याकुमारी दि.8 – प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी मागील दहा वर्षाच्या काळात देशाचा कारभार चांगला चालविला आहे.राष्ट्रहिताच्या जनहिताच्या योजना राबवल्या आहेत.गरिबांपर्यंत अन्न-धान्य मोफत पोहोचविले आहे.विविध योजनांचा लाभ सामन्य माणसा पर्यंत पोहोचला आहे.त्यामुळे सामान्य माणुस मोदीच्या पाठीशी उभा आहे.दक्षिण भारतातही जनतेचा प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलीन यांनी काँग्रेस आघाडी सोबत केलेली युती पराभुत होणार आहे.जनेतेच्या वाढत्या प्रतिसादामुळे दक्षिण भारतातही प्रधानमंत्री नरेद्र मोदीच्या नेतृत्वाचा करिष्मा दिसणार आहे.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
कन्याकुमारी येथे भाजप उमेदवार पौंन राधाकृष्ण यांच्या प्रचारार्थ नागरकोईल येथे आायोजित जाहिर सभेत ना.रामदास आठवले बोलत होते.भाजप राधाकृष्ण हे माजी केंद्रिय राज्यमंत्री आहेत.भाजपचे ते वरिष्ठ नेते आहेत.मोदी सरकार मध्ये त्यांनी अर्थराज्यमंत्री म्हणुन काम के ले आहे.अनुभवी नेते म्हणुन कन्याकुमारीतील जनतेने भाजप चे पौंन राधाकृष्ण यांना विजयी करण्याचे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
कन्याकुमारी येथे अरबी समुद्र,हिंद महासागर आणि बंगालचा उपसागर अशा तीन समुद्राचा संगम होतो.त्यामुळे कन्याकुमारी तेथे तीन समुद्रच्या संगमस्थळी समुद्राजवळ महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात यावा अशी रिपब्लिकन पक्षाची अनेक वर्षाची मागणी आहे.या मागणीच्या पूर्ततेसाठी पौंन राधाकृष्ण यांनी प्रयत्न करावे अशि सुचना ना.रामदास आठवले यांनी त्यावेळी दिली.
तामिळनाडुचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलीन यांच्या कार्यकाळात तामिळनाडुत दलित अत्याचार वाढलेले आहेत.त्यामुळे तामिळनाडुतील दलित जनता स्टॅलिन यांच्या डी.एन.के आणि काँग्रेस आघाडीला पराभवाचे पाणी पाजेल असे ना.रामदास आठवले म्हणाले.तामिळनाडुचा विकास नरेंद्र मोदीच करु शकतात.मोदीच्याच नेतृत्वात भारत देशाचा विकास होईल असा जनेतेचा विश्वास असे ना.रामदास आठवले म्हणाले.
आपल्या प्रचाराला वेळ काढुन आल्याबद्दल भाजपचे उमेदवार पौंन राधाकृष्ण यांनी ना.रामदास आठवले यांचे आभार मानले.रिपब्लिकन पक्षाच्या पाठिब्यामुळे आपण नक्की विजयी होऊ असा विश्वास पौंन राधाकृष्ण यांनी व्यक्त केला.निवडूण आल्या नंतर कन्याकुमारी आणी नागरकोईचा आपण विकास करु अशी ग्वाही पौंन राधाकृष्ण यांनी दिली.
