शासनकर्ती जमात होण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य महत्वाचे – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी चैत्यभूमीवर केले महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
मुंबई दि.14 – भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवलेंनी चैत्यभूमी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.यावेळी त्यांनी मतदान जागृती साठी निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहीम च्या फलकावर ना. रामदास आठवलेंनी स्वाक्षरी केली यावेळी त्यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले; पुत्र जित आठवले यांनी ही स्वाक्षरी करून मी मतदान करणार चा निर्धार करून सर्वांनी मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले. त्यानंतर मुंबई महापालिकेतर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ फोटोंच्या प्रदर्शनाला भेट दिली.यावेळी पूज्य भदंत राहुल बोधी महाथेरो रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर ; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे ; सचिनभाई मोहिते; साधू कटके; संजय डोळसे; रवी गायकवाड; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.संविधानाला धोका नाही जे संविधानाला धोक्यात आणण्याचा प्रयत्न करतील तेच धोक्यात येतील असे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले. दरम्यान आज सकाळी ना. रामदास आठवले यांनी दिल्लीत संसद भवन प्रंगणात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन केले.
