केंद्रीयराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा दि. 8 एप्रिल पासून तीन दिवसीय विदर्भ दौरा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसोबत रामदास आठवले प्रचार सभांना उपस्थित राहणार
मृंबई दि.6- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे येत्या सोमवार दि. 8 एप्रिल पासून तीन दिवसीय विदर्भ दौरा करणार आहेत. या दौऱ्यात विदर्भातील भाजप आणि महायुतीच्या उमेदावारांचा ते प्रचार करणार आहेत.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोबत सोमवार दि.8 एप्रिल रोजी चंद्रपुर आणि बुधवार दि.10 एप्रिल रोजी रामटेक मतदार संघात ना.रामदास आठवले पतप्रधानांसोबत प्रचारसभांना उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजप प्रणित महायुतीचा प्रमुख घटक पक्ष आहे.या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष म्हणुन रिपब्लिकन पक्षाच्या वाट्याला एक ही जागा आलेली नसली तरी रिपब्लिकन पक्ष महायुतीला खंबीर साथ देत आहे.राज्यात महायुतीचे 45 खासदार निवडून आणण्यासाठी ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाने कंबर कसली आहे.ना.रामदास आठवले हे देशभर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एन.डी.ए) उमेदवारांचा प्रचार करीत आहेत.देशभर त्यांचे दौरे सुरू आहेत.त्याचाच एक भाग म्हणून येत्या सोमवार दि.8 एप्रिल,मंगळवार दि.9 एप्रिल आणि बुधवार दि.10 एप्रिल असे तीन दिवस ना.रामदास आठवले विदर्भातील भाजप महायुतीच्या उमेदावारांचा प्रचार करणार आहेत.
सोमवार दि.8 एप्रिल रोजी सकाळी नागपुर आणि दुपारी 4 वाजता चंद्रपुर येथील मोराई विमानतळाजवळ मोरवा येथे प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांच्या सभेत उपस्थित राहुन भाजप महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार सभेत ना.रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.मंगळवार दि.9 एप्रिल रोजी चंद्रपुर,भंडारा गोदिंया या मतदार संघात ना.रामदास आठवले भाजप महायुतीचा प्रचार करणार आहेत. बुधवार दि.10 एप्रिल रोजी नागपुर आणि रामटेक मतदार संघात भाजप महायुतीचा प्रचार करणार आहेत.दि.10 एप्रिल रोजी रामटेक मतदार संघात ब्रुकबॉण्ड मैदान,कन्हान येथे महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोबत ना.रामदास आठवले प्रचार संभाना संबोधीत करणार आहेत.
संर्घषनायक ना.रामदास आठवले म्हणजे रिपब्लिकन पक्षाची आंबेडकरी चळवळीची मुलुखमैदानी बुलंद तोफ आहे.विदर्भात भाजप महायुतीच्या बाजूने रिपब्लिकन पक्षाचा रामदास आठवले नावाचा तोफखाना विरोधकांवर धडाडणार आहे.
हेमंत रणपिसे
प्रसिद्धीप्रमुख