हरयाणा विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा भाजपला सर्व जागांवर पाठिंबा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दिनांक 9 – हरयाणा विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या एकूण 90 जागांपैकी 15 जागांवर निवडणूक लढण्याची रिपब्लिकन पक्षाची जोरदार मोर्चेबांधणी झाल्यानंतर भाजप चे हरयाणा प्रदेश अध्यक्ष मोहनलाल बडौली यांनी थेट रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनाच विनंती करून हरयाणा विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा मागितला.
रिपब्लिकन पक्षाने एक ही उमेदवार उभा न करता भाजपला सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा द्यावा.त्यामुळे हरयाणा मध्ये भाजप चे सरकार सत्तेवर येईल .त्या सरकार मध्ये सत्तेतील भागीदारी रिपब्लिकन पक्षाला सन्मानाने देण्यात येईल असे आश्वासन भाजप चे हरयाणा प्रदेश अध्यक्ष मोहनलाल बाडौली यांनी दिले.
हरयाणा विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या सर्व 90 जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजप ला जाहीर पाठिंबा अधिकृत आज आपण जाहीर करीत असून हरयाणातील सर्व रिपब्लीकन कार्यकर्त्यांनी हरयाणा मधील भाजप उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.