माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट*

मुंबई दि.२७ – माजी पंतप्रधान दिवंगत डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळल्या नंतर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून थेट दिल्लीला रवाना झाले.आज सकाळी त्यांनी नवी दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्ग येथे माजी पंतप्रधान दिवंगत डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली. यावेळी ना.रामदास आठवले यांनी दिवंगत डॉ मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांची संत्वनपर भेट घेतली.यावेळी डॉ मनमोहन सिंग यांच्या कन्येची ना.रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली.माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाने भारताचा अर्थविश्र्वाचा कोहिनूर हरपला आहे.अजातशत्रू विनम्र व्यक्तिमत्व असणारे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाने भारताची मोठी हानी झाली आहे अशी शोकभावना ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
