सामाजिक

मानवतेला काळीमा फासणाऱ्या प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या बदलापुरवासियांवरील गुन्हे रद्द करावेत – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मागणी

मुंबई दि.23 – बदलापूर मधील अत्यंत लहानग्या मुलींवरील अत्याचाराची घटना महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी आहे.मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ उत्स्फूर्त आंदोलन करणाऱ्या बदलापूरवासियांवर दाखल झालेले गुन्हे रद्द करावेत.बदलापूर मधील त्या आंदोलकांना अटक करू नये अशी आपली मागणी असून त्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिली.बदलापूर प्रकरणातील पीडित लहानग्या मुलींच्या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांनी विशेष सहाय्य म्हणून आर्थिक मदत दिली पाहिजे अशी मुख्यमंत्र्यांकडे आपण मागणी करणार आहोत असे ना.रामदास आठवले म्हणाले.आज बदलापूर ला भेट देऊन येथील नगरपरिषद कार्यालयात बदलापूर प्रकरणाबाबत सर्व पोलीस आणि प्रशासन अधिकाऱ्यांची बैठक ना.रामदास आठवले यांनी घेतली.यावेळी पोलीस उपायुक्त डॉ सुधाकर पठारे; तहसीलदार अमित पुरी; बदलापूर नगर परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मारुती गायकवाड आदी अधिकारी पोलीस प्रशासन अधिकारी उपस्थित होते.बदलापूर मधील आदर्श विद्यालयात ही दुर्घटना घडली त्या शाळेचे व्यवस्थापन बरखास्त करण्यात आले असून प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे.याप्रकरणी आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या नेतृत्वात एस आय टी ची स्थापना करण्यात आली आहे.या प्रकरणातील आरोपी ला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात येणार असून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार ने गांभीर्याने दखल घेतली आहे.आरोपीला फाशी शी कठोर शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे.विरोधी पक्षाने या प्रकरणी राजकारण करू नये.हे अत्यंत निषेधार्ह मानवतेला काळीमा फासणारे प्रकरण आहे .उज्ज्वल निकम हे अनुभवी वकील असल्यानेच त्यांना विशेष सरकारी वकील म्हणून या प्रकरणी नियुक्ती केली असल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली.आरोपी शिंदे हा मूळ गुलबर्गा कर्नाटक चा रहिवासी असून 1 ऑगस्ट पडून तो कामावर आला होता.लहान मुलींच्या सांभाळा साठी महिला सेवकच शाळेत नियुक्त केले पाहिजेत त्यासाठी पुरुष मदतनीस ठेवणे अत्यंत चुकीचे आहे असे ना. रामदास आठवले म्हणाले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे सुरेश बार्शींग; अण्णा रोकडे; दयाळ बहादुर; बाळाराम गायकवाड; सिद्राम ओव्हाळ;भास्कर वाघमारे ; भगवान भालेराव; संजय गायकवाड; प्रल्हाद जाधव; रामा कांबळे; संजय गायकवाड; बाळ भालेराव; बबन केदारे; प्रल्हाद मगरे आदी अनेक रिपाइं पदाधिकारी उपस्थित होते.

Star Maharashtra

Star Maharashtra या न्यूज वेबसाईटवर प्रसिद्ध होणाऱ्या मजकूर, बातम्या, जाहिराती, व्हिडिओ, फोटो यातील मतांशी संपादक / वेबसाईट संचालक सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!