राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांचे सह इंदुमीलस्थळी उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भव्य स्मारकाची केली पाहणी

मुंबई दि.20 – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर राष्ट्रनिर्माते नेते होते. त्यांनी समानतेसाठी आपले जीवन वेचले. डॉ. आंबेडकर यांचे इंदू मिल येथील भव्य स्मारक ही त्यांना यथोचित आदरांजली असून या स्मारकामुळे देश विदेशातील लोकांना डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची महती कळेल, असे राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितले. डॉ. आंबेडकर यांच्या भव्य स्मारकामुळे भारतीय समाज अधिक सशक्त व एकसंध होण्यास मदत होईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुरुवातीला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी राज्यपालांचे स्वागत केले.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी आग्रह केल्यामुळे आज इंडुमिल स्थळी निर्माण होणाऱ्या डॉ आंबेडकर स्मारक कामाचा आढावा घेतला.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक होत असलेल्या इंदुमिल स्थळी भेट देऊन आपण धन्य झालो असे महामहीम राज्यपाल डॉ सिपी राधाकृष्णन यावेळी म्हणाले.
मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे करण्यात आलेल्या सादरीकरणाचे वेळी राज्यपालांनी स्मारकाच्या निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेतला. स्मारकामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी करण्यात येत असलेल्या सोयी – सुविधा तसेच स्मारकाचे तीव्र वादळापासून संरक्षण होण्यासाठी केलेल्या उपाययोजनाबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली.
इंडूमिल स्थळी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतराराष्ट्रीय दर्जाचे स्मारक येत्या दोन वर्षात पूर्ण होईल. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ इक्वालोटी येथे उभारला जाणार आहे.त्या पुतळ्याचे कामात कोविड कालावधीमुळे दिरंगाई झाली. आता एकूण स्मारकांचे काम ७५ टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे अशी माहिती यावेळी ना.रामदास आठवले यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. यावेळी
रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; घनश्याम चिरणकर; चंद्रशेखर कांबळे; भदंत राहुल बोधी महाथेरो; नागसेन कांबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
