सामाजिक

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या भगीनी दिवंगत शकुंतला आठवले ऊर्फ सखुताई यांच्या पार्थिवावर चेंबूर येथे अंत्यसंस्कार

मुंबई दि.24- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या भगीनी शकुंतला आठवले ऊर्फ सखुताई यांचे काल दि.23 जुन रोजी रात्री 11 वाजता वयाच्या 77व्या वर्षी हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.चेंबुर मधील सुश्रुत रुग्णालयात त्या गेल्या आठ दिवसापासुन दाखल होत्या.काल रात्री हदयविकाराचा तिव्र झटका आल्याने त्यांचे रुग्णालयातच निधन झाले.सखुताई यांच्या निधनाची दु: खद वार्ता कळताच रिपब्लिकन पक्षात शोककळा पसरली.ना.रामदास आठवले यांनी दिल्लीतील कामकाजात बदल करुन ते तातडीने मुंबई ला येऊन दिवंगत शकुंतला आठवले उर्फ सखुताई यांच्याअंत्यविधी उपस्थित राहिले .दिवंगत शकुंतल आठवले यांच्या पर्थिवावर ना.रामदास आठवले यांच्या हस्ते अग्निसंस्कार करण्यात आले.यावेळी भदंत राहुल बोधी यांनी बौध्द पद्धतीने अंत्यसंस्कार विधी केला. बौद्धाचार्य म्हणून प्रकाश जाधव ; सोना कांबळे उपस्थित होते.आहेत.आज दि.24 जुन रोजी सायंकाळी 6 वाजता चेंबूर च्या चरई स्मशानभुमीत दिवगंत शकुंतला आठवले ऊर्फ सखुताई यांच्या पार्थीव देहावर बौध्दध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.चेंबुर मधील शेल कॉलनी येथील एव्हरेस्ट सोसायटी जैतवन उद्याना समोर दिवगंत शकुंतला आठवले ऊर्फ सखुताई यांच्या पार्थीव आज दुपारपासुन अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.शेल कॉलनी ते चरई स्मशानभुमी पर्यंत दिवगंत शकुंतला आठवले ऊर्फ सखुताई यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.या अंत्ययात्रेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत.आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन चळवळीतील अनेक मान्यवर कार्यकर्ते दिवगंत शकुंतला आठवले ऊर्फ सखुताई यांना शेवटची भावपूर्ण श्रध्दांजली अपर्ण करण्यासाठी त्यांच्या अंत्ययात्रेत उपस्थित राहणार आहेत. येत्या दि.30 जून रोजी सकाळी 10 वाजता दिवंगत शकुंतला आठवले उर्फ सखू ताई यांचा जलदान विधी आणि पुण्यानुमोदन कार्यक्रम शेल कॉलनी समाज मंदिर सभागृह चेंबूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

दिवगंत शकुंतला आठवले ऊर्फ सखुताई यांच्या निधनामुळे रिपब्लिकन चळवळीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्ष हा एक रिपब्लिकन परिवार आहे.त्यामुळे दिवंगत शकुंतला आठवले ऊर्फ सखुताई या रिपब्लिकन कार्यकर्त्यासाठी मोठ्या बहिणीसमान होत्या.सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी मोठ्या बहीणीची माया दिली.त्यांचा स्वभाव प्रेमळ मायाळु होता.ना.रामदास आठवले यांच्या बालपणाच्या आठवणी त्यांनी जपल्या होत्या.त्यांना आपल्या भावा बद्दल म्हणजेच रामदास आठवलेंबद्दल प्रचंड अभिमान होता.दिवगंत शकुंतला आठवले ऊर्फ सखुताई यांच्या निधनामुळे रामदास आठवले यांच्यावरील मातृतुल्य बहीणीची माया; ममतेची सावली हरपली आहे. शकुंतला आठवले ऊर्फ सखुताई यांच्या निधनामुळे संपूर्ण रिपब्लिकन पक्षात शोक आणि हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दिवंगत शकुंतला आठवले यांच्या अंत्ययात्रेत रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले; त्यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले; कुमार जित आठवले; रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर ; राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; युवक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू कागदे; पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे; उत्तर महाराष्ट्र चे अध्यक्ष प्रकाश लोंढे; सुरेश बार्शींग ; दयाळ बहादुरे; संगीता आठवले; डी एम चव्हाण; बाळासाहेब गरूड; घनश्याम चिरणकर; श्रीकांत भालेराव; दादू झेंडे; सुनील मोरे; संजय डोळसे; रवी गायकवाड;चंद्रशेखर कांबळे ; ऋषी माळी; महादेव साळवे; अजित रणदिवे; साधू कटके ;बाबा काळे;अभाया सोनवणे; ममता अधांगळे; उशा रामलू; रेश्मा खान; उदयराज तोरणे आदिनाग रणधीर; रतन अस्वारे, राजा अडाटे, सुनील गमरे; विनोद जाधव सचिन कासारे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Star Maharashtra

Star Maharashtra या न्यूज वेबसाईटवर प्रसिद्ध होणाऱ्या मजकूर, बातम्या, जाहिराती, व्हिडिओ, फोटो यातील मतांशी संपादक / वेबसाईट संचालक सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!