नाशिकमध्ये पत्रक काढुन दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या षडयंत्राची सखोल चौकशी करावी – केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.22- नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात पत्रक काढुन दलित आणि सवर्ण या दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा निंदनीय प्रयत्न करण्यात आला आहे.दोन समाजात तेढ निर्माण करुन फुट पाडण्याचा प्रयत्न असणाऱ्या या प्रकरणाचा आपण तिव्र निषेध करित आहोत.या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.या पत्रकावर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना करण्याच्या झालेल्या प्रकाराचा आम्ही तीव्र निषेध करित आहोत असे ना.रामदास आठवले म्हणाले.नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश आणि निळा झेंडा लावण्यास मनाई असणारे पत्रक काढुन दलित बौध्द आणि आंबेडकरी जनतेच्या तीव्र भावना दुखावल्या आहेत.दलित आणि आणि सवर्ण या दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या हेतुने संबंधीत वादग्रस्त पत्रक काढण्याचा समाजविधाक प्रयत्न झाला आहे.या समाजविघातक पत्रकाचा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत असे सागतानाच आंबेडकरी जनतेने संयम बाळगण्याचे आवाहनही ना.रामदास आठवले यांनी केले आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेशाचा केलेला सत्याग्रह हा समतेच्या, मानवतेचा ऐतिहासिक लढा ठरलेला आहे.या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर परिसराबाबात काढण्यात आलेले पत्रक हे दलित सवर्णा मध्ये फुट पाड़ण्याचे षडयंत्र आहे.या षडयंत्राचा आम्ही तीव्र निषेध करित आहोत असे ना.रामदास आठवले म्हणाले.