स्त्रीशक्तीचे मतदान नरेंद्र मोदींना करणार तिसऱ्यांदा पंतप्रधान — सौ.श्रुती मनीष पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवभक्त आहेत.मागील निवडणुकीत 2019 च्या मतमोजणीला ते केदारनाथ मध्ये महादेवाची आराधना करताना सर्व जगाने पाहिले आहे.त्यावेळी मोदींवर महादेवाची असीम कृपा झाली आणि 2019 ला भाजप ला 303 जागा जिंकता आल्या. महादेवाच्या कृपेमुळे जनता जनार्दनाचा आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदींना लाभला. यंदा 2024 ची निवडणूक मोदींना जड जाते आहे अशी चर्चा आहे.या चर्चेचा फुगा 4 जून ला फुटणार असून जनता जनार्दनाचा भरभरून आशीर्वाद मोदींना लाभणार आहे.यावेळी फक्त महादेवाचा आशीर्वाद मोदींच्या पाठीशी नसून शिवासोबत शिवशंकराची अर्धांगिनी महादेवीचा प्रत्यक्ष शक्तीचा नरेंद्र मोदींना आशीर्वाद मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव आणि शक्ती चा आशीर्वाद मिळणार आहे. मातृशक्तीचा स्त्री शक्तीचा आशीर्वाद नरेंद्र मोदींच्या पाठीशी असल्यामुळे भारतमातेचा लाडका पुत्र नरेंद्र मोदी यांच्या समोर कोणतीही अडचण टिकणार नाही.भारत मातेची सेवा करण्यासाठी स्वतःला प्रधनसेवक समजणाऱ्या नरेंद्र मोदींना स्त्रीशक्तीचा मातृशक्तीचा आशीर्वाद लाभणार असून येत्या 4 जून ला मोदींच्या झोळीत चारशे पेक्षा जास्त जागांचे दान मिळणार आहे. देशभरातील सर्व जाती धर्माच्या स्त्रियांनी निर्धार केला आहे की मोदींचा चारशे पार चा नारा यशस्वी करायचा.म्हणून स्त्रीशक्तीचे मतदान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करेल असा आम्हाला विश्वास आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवशक्ती आणि स्त्रीशक्ती सोबत भीमशक्ती चा आशीर्वाद ही मिळणार आहे काँग्रेस विरोधक कितीही संविधान बदलण्याची अफवा पसरवत असले तरी रिपब्लिकन चळवळीचे राष्ट्रीय नायक नेतृत्व रामदास आठवले हे मोदींच्या सोबत आहेत.संविधान बदलण्याची काँग्रेस ची अफवा त्यांनी भिमटोला लगावून काँग्रेस आणि काँग्रेसच्या अफवेचा चक्काचूर केला आहे.त्यामुळे भीमशक्तीचाही आशीर्वाद नरेंद्र मोदींना लाभणार आहे.
भारत देश स्वतंत्र झाल्या नंतर पहिल्यांदा सांसदेत महिलांना 33 टक्के आरक्षण देणारा कायदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंजूर करून घेतला.त्याची अंमलबजावणी पुढील 2029 साली होणार आहे. हा कायदा मंजूर करून महिलांना संसदेत आणि विधानसभेत मोठे प्रतिनिधित्व मिळणार आहे. राणीच्या पोटातून राजा किंवा राणी जन्माला यायची ते दिवस संपले आहेत. लोकशाहीच्या नव्या युगाला आरंभ झाला आहे. खऱ्या अर्थाने महिलांसाठी राजकीय न्याय मिळाला आहे. महिलांना लोकशाहीचा संसदिय लोकशाहीचा 33 टक्के सहभाग मिळणार आहे.संसदेत आणि विधानसभेत महिलांना संधी मिळणार आहे.विधानसभेचा संसदेचा राजमार्ग केवळ राजकीय नेत्यांच्या घरातील कुटुंबातील स्त्रियांना मिळत होता.बहुतांश प्रमाणात राजकीय नेत्याची आई बहिण पत्नी वहिनी यांना, नाते संबंधातील महिलांना विधानसभा आणि संसदेचे प्रतिनिधित्व मिळत होते.आता सामान्य घरातील कार्यकर्त्या कर्तृत्ववान महिलांना सुद्धा विधानसभेत
जाण्याची , संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.त्यासाठी आपले अनमोल मतदान देऊन प्रत्येक जातीधर्माची स्त्री नरेंद्र मोदींना थँक्यू म्हणणार आहे.प्रत्येक स्त्री पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करणार आहे.
मुस्लिम महिलांनी ही नरेंद्र मोदींना या निवडणुकीत मतदान करून थँक्यू म्हणण्याचा निर्धार केला आहे. मुस्लिम महिलांना तलाक तलाक तलाक म्हणून तलाक दिला जात होता ही पद्धत अत्यंत अन्यायकारक होती.ती तीन तलाक ची पद्धत बंद करण्याचा क्रांतिकारी कायदा नरेंद्र मोदींना संसदेत केला. ट्रिपल तलाक रद्द करणारा कायदा अंमलात आणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम महिलांना न्याय दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत मुस्लिम महिला सुद्धा मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करणार आहेत. मागील 10 वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्कृष्ट काम केलेले आहे.त्यांनी सर्वात आधी ज्यांचे बँकेत खाते नाही त्या गरीब स्त्रियांना जन धन योजनेतून बँकेत मोफत खाते खोलून दिले.ग्रामीण भागातील महिलांना चूल फुंकून चुलीच्या धुराने डोळे लालबुंद व्हायचे.तो त्रास दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात पहिल्यांदा देशात मोफत गॅस सिलेंडर देण्यासाठी उज्ज्वला योजना यशस्वी करून गरीब ग्रामीण महिलांना गॅस सिलेंडर दिले आहेत.उद्योग व्यवसाय करू पाहणाऱ्या महिलांना मुद्रा योजना सह उद्योग आधार दिला. महिलांसाठी अनेक कामे मोदींनी केली आहेत.अत्यंत गरीब शेवटच्या स्तरावरील फेरीवाल्या महिलांना स्वानिधी चा आधार मोदींनी दिला आहे. चाकरमानी महिलांना मेट्रो मुळे चांगला वातानुकूलित प्रवासाचा लाभ घेता येतो आहे. ज्यांना घर नाही भाडेकरू म्हणून राहणाऱ्या कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला आहे. लाखो लोकांना हक्काचे घर मिळाले आहे.त्यामुळे कोणी काहीही बोलो.निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होतात.पण संधी दिल्यावर कोण काम करतं आणि कोण काम करीत नाही हे मागच्या 70 वर्षांत जनतेने पाहिले आहे. मोदींची 10 वर्षांतील कामगिरी ही बिनतोड आहे.त्यामुळे ये पब्लिक है सब जानती है.कोणाला संधी द्यायची ती जनतेला चांगले माहीत आहे.विरोधकांनी कितीही आरोप केले तरी नरेंद्र मोदींचा करिष्मा होणार आहे.शिवशक्ती भीमशक्ती आणि स्त्रीशक्ती नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणार आहेत हे निश्चित!