लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रामदास आठवलेंचा फॅक्टर महाविकास आघाडीला करणार फ्रॅक्चर
केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाची साथ महायुतीला विजयी करणार देशात लोकसभेच्या सार्वत्रीक निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात राजकारणाचा पारा चढलेला आहे.उन्हाने अंगाची लाही-लाही होत असताना राजकारण हे उन्हासारखे तप्त झाले आहे.महाराष्ट्रात ही राजकारण आरोपांची आग ओकत आहे. राजकारणी एकमेकांवर आरोपांच्या तोफा डागत आहेत.राष्ट्रीय स्तरावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपची राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए) विरुध्द राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसची इंडि आघाडी असा सामना रंगलेला आहे.या सामन्यात नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हिमालया सारखे उंच आणि दिग्विजयी ठरत आहे.मोदींचा तिसऱयांदा प्रधानमंत्री पदी आरुढ होण्याचा एनडीए चा लोकसभा निवडणुकीत बहुमत मीळविण्याचा संकल्प पूर्ण होण्याचा आत्मविश्वास भाजप आणि एनडीए च्या घटकपक्षा मध्ये दिसत आहे. उत्तर भारत राजस्थान गुजरात आणि दक्षिण भारतात यंदा मोदींची जादु चालणार आहे.पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात भाजप ला यश मिळणार आहे.भाजप चा 400 पारचा नारा यशस्वी करण्यासाठी बिहार,मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राची एनडीए ला महत्वाची साथ लाभणार आहे.आसाम मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या मदतीमुळे भाजप ला आसाम मध्ये मोठा विजय मिळणार आहे.संपूर्ण देशात बिहार आणि महाराष्ट्रात भाजपची एनडीए आघाडी आणि काँग्रेसची इंडी आघाडी यांच्यात जोरदार रस्सीखेंच सुरु आहे.महाराष्ट्रात महायुती आणी महाविकास आघाडीत काटे की टक्कर आहे.महायुतीमध्ये भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), रिपब्लिकन पक्ष(आठवले), महाराष्ट्र नवनिर्माण सेना,रासप आदी पक्ष संघटनांचे मजबुत संघटन आहे.यांच्या समोर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, उध्दव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष यांच्या एकजुटीतुन साकारलेल्या महाविकास आघाडी ने महाराष्ट्रात महायुती समोर कडवे आव्हान उभे केले आहे.महायुतीने महाराष्ट्रात दिलेला अब की बार 45 पार चा नारा मागे पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.19 एप्रिल,26 एप्रिल,7 मे आणि आता 13 मे चे मतदान होणार आहे.पहिल्या तीन टप्प्यात महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी काटे की टक्कर झालेली पाहुन महायुतीने रिपब्लिकन नेते संघर्षनायक रामदास आठवले यांना मैदानात उतरवले.हुकुमाचा एक्का बाजी पलटवतो तसेच संघर्षनायक रामदास आठवले यांनी आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षानी बाजी पलटवत महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुती चे पारडे भारी केले आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीच्या उमेदवारांचा महाराष्ट्रात जोरदार प्रचार केलेला आहे.महाराष्ट्रात महायुतीने रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला लोकसभेची एक हि जागा दिली नाही.त्यामूळे उलट सुलट चर्चा सुरु होत्या.त्या चर्चा खोडुन काढुन रामदास आठवले महायुतीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.आणि उंच उडी घेण्यासाठी दोन पाऊले मागे यावे लागते तसेच लोकसभा निवडणुकीत एक ही जागा न घेऊन रिपब्लिकन पक्ष दोन पाऊले मागे आलेला आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष मोठी झेप घेणार आहे.रामदास आठवले यांनी दोन पाऊले मागे घेतली असली तरी लोकसभा निवडणुकी नंतर पँथर सारखी झेप घेणार आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यास ना.रामदास आठवले यांना केंद्रिय कॅबीनेट मंत्री पदी बढती मीळणार आहे.महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 10 जागा आरपीआय ला मिळणार आहेत.राज्यात एक मंत्री पद ही मिळणार आहे.एक विधान परिषद ही मिळणार आहे.हे यश मिळाल्यास रिपब्लिकन पक्षाची मोठी झेप ठरेल.पढील काळात रिपब्लिकन पक्षाला मोठे यश मिळविण्यासाठी आज भाजप महायुतीला लोकसभा निवडणुकीत साथ देणे महत्वाचे आहे.महाराष्ट्रात महायुतीच्या 40 पेक्षा जास्त जागा निवडुण आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची साथ महत्वाची आहे.महाराष्ट्रात रिपब्लिकन कार्यकर्त्यानी मेहनत करुन महायुतीच्या 45 जागा निवडुण आणाव्यात असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार यांनी महायुती समोर मोठे आव्हान उभे केले आहे.मध्यंतरी उद्भवलेला मनोज जरांगे फॅक्टर हा महायुतीच्या विजयातील मोठा अडसर ठरत आहे.उध्दव ठाकरेंना मोठी सहानुभुती असल्याची चर्चा आहे.त्यामूळे महायुतीला राज्यात 45 पेक्षा जास्त जागा जिंकताना महाविकास आघाडीशी मोठी झुंज द्यावी लागत आहे.शरद पवार,उध्दव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेद्र फडणविस,अजित पवार,राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महायुतीचा मुकाबला म्हणजे का काटे की टक्कर झाला आहे.हा बरोबरीतला सामना रामदास आठवलेच्या मदतीमुळे महायुतीला विजयी करणारा ठरत आहे.रामदास आठवलेंची अनमोल साथ महायुतीच्या उमेदवारांना विजयी करणारी ठरत आहे. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांमुळे महायुती समोर आव्हान उभे राहिले आहे.त्यातील बारामती आणि माढा या जागा जिंकणे महायुतीला कठीण झाले होते.मात्र रामदास आठवले यांनी पश्चिम महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारंचा जोरदार प्रचार केला.बारामती येथे एकाच दिवसात चार-चार सभा घेतल्या पुणे,इंदापुर,माढा,धाराशिव,कुरडुवाडी येथे हेलीकॉप्टर दौरा करुन महायुती उमेदवारंचा प्रचार केला.या दौऱयात भाजप आमदार प्रसाद लाड हे ना.रामदास आठवलें सोबत होते.आठवलेंचा प्रभाव दलित मतांसोबत मराठा,ओबीसी,धनगर समाज आणि मुस्लिम समाजा सह सर्व समाजावर आहे.असे मत स्व:ता महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद लाड यांनी कुरडुवाडी येथे व्यक्त केले होते. त्यामुळे माढा हा डगमगलेला भाजप महायुतीचा मतदार संघ रामदास आठवलेमुळे मजबुत झाला आहे.माढा लोकसभा मतदार संघा प्रमाणे बारामती,शिरुर,मावळ,रायगड,पुणे,सातारा,सांगली,कोल्हापुर,हातकणगंले,धाराशिव हे मतदार संघ मजबुत झाले आहेत.आठवलेच्या रिपब्लिकन पक्षामुळे मराठवाड्यात परभणी,हिंगोली,जालना,छत्रपती संभाजी नगर,धाराशिव,लातुर आणि नांदेड हे मतदार महायुतीसाठी मजबुत झाले आहेत.उत्तर महाराष्ट्रात रामदास आठवलेच्या नेतृत्वामुळे शिर्डी,अहमदनगर,जळगाव,रावेर,नंदुरबार,धुळे आणि नाशिक हे मतदार संघ महायुतीच्या पदरात पडणार आहे.मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघात आणि ठाण्यातील ठाणे,कल्याण,भिवंडी आणि पालघर हे मतदार संघ ही रिपब्लिकन पक्षाच्या मदतीमुळे महायुतीला जिंकता येणार आहे.विर्दभातील वर्धा,रामटेक,भंडारा,गोंदिया,यवतमाळ वाशिम ,बुलढाणा ,नागपुर,चंद्रपुर,अमरावती या जागांवर आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाची महायुतीला मोलाची साथ लाभली आहे.रामदास आठवलेंच्या पाठीशी रिपब्लिकन जनतेचे मतदान मोठ्या प्रमाणात आहे.आणि रामदास आठवलेंना माणनारा वर्ग सर्व जाती धर्मात आहे.महाराष्ट्रात यंदा महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये काटे की टक्कर होत आहे.पूर्वी जसे लाखोच्या मताधिक्याने उमेदवार निवडुण येत असत तसा विजय या लोकसभा निवडणुकीत कोणाला ही मिळणार नाही.केवळ दहा ते वीस हजारांच्या फरकाने उमेदवार विजयी होतील.या विजयाच्या आकडेवारीत रामदास आठवलेंना मानणाऱया रिपब्लिकन जनतेच्या मतदाना आकडा जादुई आकडा ठरणार आहे.महाराष्ट्रात रामदास आठवलेंच्या नेतृत्वाचा करिष्मा घडणार असुन भाजप महायुतिच्या 40 पेक्षा जास्त जागा विजयी होणार आहेत.देशात नरेद्र मोदींच्या नेतृत्वाचा करिष्मा कायम राहणार आहे.महाराष्ट्रात मात्र रामदास आठवलेंचा फॅक्टर महाविकास आघाडीला फ्रॅक्चर करणार आहे.
हेमंत रणपिसे