कोकणची माणसं साधी भोळी, भरुन देतील महायुतीच्या मतांची झोळी- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.20- उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांना युतीसोबत येण्यास सांगितले,मात्र त्यांनी ऐकले नाही आणि त्यांच्या पक्षात फुट पडली असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पेंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.
ईशान्य मुंबई चे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारासाठी भांडुपमध्ये आयोजित केलेल्या जाहीर सभेत ना.रामदास आठवले बोलत होते.सभेत
बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नसल्याने नाराज झालेल्या शिवसैनिकांबाबत बोलताना केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी नाराजी योग्य असल्याचे म्हटले तसेच महाराष्ट्रात पहिली युती झाली ती अटलबिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या संगमतानेच पूर्वी शिवसेनेचा आमचा 36 आकडा होता,पण आता सध्या 63 चा आहे.पण बाळासाहेब ठाकरे यांनी सोबत येण्यास सांगितले.बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरून भीमशक्ती शिवशक्ती एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता,अशी आठवण त्यांनी सांगीतली.
भांडुप मध्ये कोकणी माणूस मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे,असे सांगतांना ना.रामदास आठवले यांनी कोकणची माणस साधी भोळी,भरुन टाकतील मिहीर कोटेचा यांची मतांची झोळी अशी कविता सादर करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करुन ना.आठवले ना दिलखुलास दाद दिली.आपल्या भाषणात आठवलेंनी अनेक चारोळी कविता आपल्या खास शैलीत सादर करुन भांडुपवासियांना खुश करुन सभा जिंकली.
