डॉ.बाबासाहेब आंबेडकर नसते तर,आम्ही नसतो – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.19- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.या देशाचे भाग्यविधाते आहेत.भारत देशाचा आत्मा आहे. देशाला सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाणारे क्रांतिसूर्य डॉ.बाबासाहेब अंबेडकर झाले नसते तर आम्ही कुठेच नसतो.ते होते म्हणून आम्ही आहोत.त्यांच्यामुळेच आम्ही सुटा-बुटात दिसत आहोत.ते नसते तर आम्ही कुठेच नसतो असे प्रदिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.धारावी येथे प्रज्ञा बुध्द विहार सेवा समिती च्या वतीने आयोजित महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती उत्सवा निमित्त आयोजित कार्यक्रमात ना.रामदास आठवले बोलत होते. या वेळी विचार मंचा वर रिपाइंचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे;,दिलीपदादा जगताप,साधु कटके,प्रकाश जाधव आदि अनेक मान्यंवर उपस्थितीत होते.