पुढील लोकसभा निवडणूक केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी ईशान्य मुंबईतून लढावी

घाटकोपर पूर्व येथील कामराज नगर मधील संघाराम बुद्धविहाराचे आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.स्थानिक आमदार पराग शहा यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या या बुद्ध विहार लोकार्पण सोहळ्यात ना.रामदास आठवले यांच्या हस्ते पूज्य भिक्खु संघाला कठीण चिवरदान करण्यात आले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे गौतम सोनवणे, स्थानिक समाज सेवक परमेश्वर कदम , बाळू सोनवणे, अनिल घायवट , रवी नेटवटे आदी मान्यवर उपस्थित होते. ईशान्य मुंबईतून जर केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणूक लढवली असती तर ते बहुमताने निवडून आले असते. पुढील लोकसभा निवडणूक ना.रामदास आठवले यांनी ईशान्य मुंबईतून लढवावी ते निश्चित बहुमताने निवडून येतील अशी आमची जाहीर मागणी असल्याचे माजी नगरसेवक परमेश्वर कदम यांनी म्हंटले.
