
मुंबई दि.1- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमी येथे येणाऱ्या लाखो आंबेडकरी अनुयायांच्या सोयी सुविधा आणि व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राज्य शासन; मुंबई महापालिका; पोलीस प्रशासन ; रेल्वे प्रशासन ; जिल्हाधिकारी सर्व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत आज मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथे घेण्यात आली. यावेळी मुंबई चे पालक मंत्री ना.दीपक केसरकर उपस्थित होते.तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समन्वय समिती चे पदाधिकारी आणि रिपब्लिकन पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थीत होते.
