केवळ विरोधासाठी विरोध करणारा विरोधी पक्ष लोकशाहीला घातक – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

हैद्राबाद दि.27 – जीवनाच्या उंच आकाशात झेप घेण्यासाठी तरुणांच्या पंखात कौशल्य विकासातुन रोजगाराचे बळ देणारा यंदाचा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे. सर्व समाज घटकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय देणारा अर्थसंकल्प आहे.बिहार आणि आंध्रप्रदेश राज्यांचा काँग्रेसच्या सत्ताकाळापासुन राहिलेला अनुशेष भरुन काढण्यासाठी या राज्यांना केद्रांने विशेष पॅकेज दिले आहे.त्यासोबत तेलंगणा आणि महाराष्ट्रला ही अनेक प्रकल्पासाठी भरीव निधी दिला आहे.कोणत्याही एका राज्यासाठी केंद्राचा बजेट नसतो तर देशातील सर्व राज्यांचा विचार करुन समतोल साधणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे.विरोधी पक्षांनी सरकारला चांगल्या सुचना कराव्यात तसेच सरकारच्या चांगल्या निर्णयाचे विरोधकांनी स्वागत ही केले पाहिजे.राजकारणासाठी केवळ विरोधासाठी विरोध करणारा विरोधी पक्ष लोकशाहीला घातक असतो असा टोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी काँग्रेसला लगावला.
तेलंगणातील मेडक या जिल्हात केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ना.रामदास आठवले बोलत होते.केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणुन केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी ना.रामदास आठवले आज तेलंगणा दौऱ्यावर आले आहेत.मेडक जिल्हयाचे भाजप खासदार रघुनंदनराव यांनी ना.रामदास आठवले यांचे मेडक जिल्हयात स्वागत केले.मेडक जिल्हा भाजप कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेस संबोधीत केले. यावेळी भाजप आणि रिपब्लिकन पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
काँग्रेस सरकारच्या काळात अनेकदा काही राज्याना विशेष पॅकेज देण्यात आले होते.आंध्रप्रदेश आणि बिहार ला मात्र कोणतेही पॅकेज दिले नव्हते.त्यामुळे आंध्रप्रदेश आणि बिहाराचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वातील एन डी ए सरकारने आंध्रप्रदेश आणि बिहारला विशेष आर्थीक पॅकेज दिले आहे.त्या सोबत देशभरातील सर्व राज्यांना समतोल साधणारे बजेट दिले आहे.दलित आदिवासी,ओबीसी,मध्यमवर्ग सर्वांना प्रेरणादायी असा केंद्राचा अर्थ संकल्प आहे. 4 कोटी तरुणांना रोजगार देणारा अर्थ संकल्प आहे.चांगल्या निर्णयांना खोटी कारणे सांगुन विरोध करणे केवळ राजकारणासाठी सरकारच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करणे ही काँग्रेसची वृत्ती लोकशाही ला घातक आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.
केंद्र सरकारची अग्निवीर योजना युवकांना रोजगार देणारी आहे.4वर्ष सेवा केल्यानंतर अग्नीविरांना भारतीय सैन्यांत रोजगाराची संधी दिली जाते.तसेच अनेक राज्यात नोकरीसाठी अग्निविरांना प्रधान्य दिले जाते.असे ना.रामदास आठवले यांनी सागीतले.
