*राज्यपालांच्या उपस्थितीत पीपल्स एजुकेशन सोसायटीचा वर्धापन दिन साजरा* *दलित बहुजनांच्या सामाजिक उत्थानासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटी ची महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केली – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

मुंबई दि. 8 – शिक्षणा शिवाय सामाजिक क्रांति घडू शकतं नाही.गोरगरीब दलित बहुजन समाजातील मुलांनी शिक्षण उच्च शिक्षण घेऊन सामजिक परिवर्तन व्हावे; दलित बहुजनांच्या सामाजिक उत्थानासाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी ची स्थापना केली. या ऐतिहासिक ठरलेल्या शिक्षणांस्थेच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्यपालांनी लक्ष द्यावे असे जाहीर आवाहन पीपल्स एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. पीपल्स एज्युकेशन सोसायटी चा आज ७९ वां वर्धापन दिन सोहळा मुंबईत यशवंत चव्हाण सेंटर येथे ना.रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम मा रमेश बैस उपस्थित होते.यावेळी राज्यपालांच्या आणि ना.रामदास आठवले यांच्या हस्ते विविध मान्यवरांना डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने गौरवण्यात आले.महामानव क्रांतीसुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधनामुळे देश एकसंघ अभेद्य आहे.देश कोणी तोडू शकत नाही.कोणतीही शक्ती संविधान बदलू शकत नाही.महामानव डॉ.बाबसाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेला बुद्धिझम हा मानवतावादी; विज्ञानवादी समतावादी आहे.भारत देशाची आर्थिक सामाजिक सर्व क्षेत्रात पायाभरणी करण्याचे काम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी केलेले आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.त्यासाठी त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या दामोदर व्हॅली प्रकल्पाचे उदाहरण यावेळी सांगितले.दरम्यान या कार्यक्रमास महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते मात्र ते या कार्यक्रमाला न येता गुजरात ला गेल्याचे कळविण्यात आले.ही बाब समोर आल्यानंतर ना.रामदास आठवलेंनी स्टेजवरच चंद्रकांतदादांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.आम्ही सरकार सोबत आहोत .युती मध्ये आहोत. मात्र आम्हाला न्याय दिला जात नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याऐवजी अन्य कोणता मोठा कार्यक्रम होता असा सवाल ना.रामदास आठवलेंनी केला.पीपल्स एज्युकेशन सोसायटी मध्ये अनेक वर्ष वाद आहेत .याबाबत धर्मादाय आयुक्तांनी दोन वेळा निकाल देऊन पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे रामदास आठवले हे अधिकृत अध्यक्ष आणि त्यांच्या अध्यक्षते तील कार्यकारिणी अधिकृत असल्याचा निकाल दिला आहे.त्यानुसार विद्यापीठाने कारवाई केली पाहिजे.मात्र धर्मदाय आयुक्तांचा निकाल असून कोणतीही अंमलबजावणी विद्यापीठाने याबाबत केली नाही.यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतादादा पाटील यांच्या कडे अनेक बैठका झाल्या मात्र निर्णय घेऊन अंमलबजाणी झाली नाही. माझ्या अध्यक्षते तील कमिटी अधिकृत असून न्यायाची बाजू असून आमच्यावर अन्याय केला जात आहे.सरकार मध्ये आमचा पक्ष असला तरी आम्हाला न्याय दिला जात नाही. आमची बाजू न्यायाची असून आम्हाला न्याय दिला जात नाही .मी अन्याय सहन करणारा नाही. मी अन्यायाविरुद्ध संघर्ष करीत इथपर्यंत पोहोचलो आहे.मी जर संघर्ष सुरू केला तर सर्व काम बिघडेल असा इशारा ना.रामदास आठवलेंनी यावेळी दिला .प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे न्यायाची भूमिका घेऊन देशाच्या विकासासाठी पुढे चालले आहेत.आमचा त्यांना पाठिंबा आहे.त्यामुळे महामहीम राज्यपाल महोदयांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी कडे लक्ष देऊन न्याय द्यावा असे आवाहन ना.रामदास आठवलेंनी यावेळी केले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ साली स्थापन केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही देशातील एक अग्रणी शैक्षणिक संस्था असून गेल्या ८ दशकांमध्ये, सोसायटीने सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय लोकांच्या अनेक पिढ्यांना शिक्षित व स्वावलंबी केले आहे. आज संस्था विविध अडचणींना तोंड देत आहे. या समस्या सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन यावेळी महामहीम राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे दिले. यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ सुखदेव थोरात, सोसायटीचे विश्वस्त पद्मश्री उज्वल निकम, एडव्होकेट बी.के. बर्वे, सचिव डॉ वामन आचार्य, सहसचिव डॉ यु एम मस्के, कार्यकारी समिती सदस्य चंद्रशेखर कांबळे आदी उपस्थित होते. ज्यांनी जोखीम पत्करली, महासागरांवर वर्चस्व निर्माण केले आणि उद्योजक आणि व्यवसाय करण्यासाठी देश आणि खंड पार केले, त्यांनी जगावर राज्य केले. भारत अनेक शतकांपासून सागरी राष्ट्र होते. जगातील अनेक दूरवरच्या देशांशी भारताचे व्यापारी संबंध होते. देशाला त्याचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी शिक्षण, उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, कौशल्य शिक्षण आणि उद्यमशीलतेला प्राधान्य द्यावे लागेल, असे राज्यपालांनी सांगितले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आज मुंबई, नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नांदेड, बंगलोर आणि बिहारमध्ये अनेक शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे चालविली जात असून एकूण दीड लाख विद्यार्थी विविध शैक्षणिक सुविधांचा लाभ घेत असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आज जगातील सर्वात तरुण राष्ट्र म्हणून उदयास आले आहे. जगातील अनेक देश, विशेषत: वृद्ध देश त्यांच्या कुशल मनुष्यबळाची पूर्तता करण्यासाठी भारताकडे पाहत आहेत. या दृष्टीने पीपल्स एज्युकेशन सोसायटीने उच्च शिक्षणाला कौशल्य शिक्षणाची जोड द्यावी तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता विषयाबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावे असे राज्यपालांनी सांगितले.
