रिपब्लिकन पक्ष लवकरच निवडणूक आयोगाची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

नवी दिल्ली दि.3 – रिपब्लिकन पक्षाला लोकसभा निवडणुकीत मणिपूर मध्ये 17 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाल्या मुळे मणिपूर मध्ये रिपब्लिकन पक्ष राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त पक्ष झाला आहे.यापूर्वी नागालँड मध्ये दोन आमदार निवडून आल्याने नागालँड मध्ये ही रिपब्लिकन पक्ष राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त पक्ष झाला आहे.आगामी महाराष्ट्र राज्य आणि हरयाणा ; झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करून आणखी दोन राज्यात चांगले मतदान मिळवून रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाची मान्यता प्राप्त राष्ट्रीय पक्ष ठरेल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला.नविदिल्ली येथे कोंस्टीट्युशन क्लब मध्ये दिल्ली प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे तिसऱ्यांदा केंद्रीय राज्य मंत्री पदी निवड झाल्याबद्दल ना.रामदास आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात आला.त्यावेळी ना.रामदास आठवले बोलत होते. या कार्यक्रमास सौ सीमाताई आठवले; दिल्ली प्रदेश अध्यक्ष फक्रे आलम गुड्डू आणि अनिल सिंह तसेच उत्तर भारत अध्यक्ष मंजू छिबेर; गौतम सोनवणे ; सुरेश बारशिंग शिलाताई अनिल गांगुर्डे ; माजी मंत्री संदीप वाल्मिकी ; रवी कुंडली तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.रिपब्लिकन पक्ष सर्व जाती धर्मीयांचा पक्ष आहे. लोकांचे प्रश्न सोडवा ; गरिबांसाठी झोपडपट्टी वासियांसाठी त्यांच्या न्याय हक्का साठी लढा असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.देशात जिथे जाल तिथे रिपब्लिकन पक्ष पोहोचला आहे.तरीही देशभरात घराघरात रिपब्लिकन पक्ष हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे हा संदेश पोहोचवा असे आवाहन ना.रामदास आठवलेंनी केले. आगामी दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे सामाजिक न्याय मंत्रालयाच्या विविध योजनांची माहिती देणारे शिबिर आयोजित करण्यात आले होते. देशभरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.ना.रामदास आठवलेंनी या शिबिराला मार्गदर्शन केले.
