
नविदिल्ली दि. 9 – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मचा शपथविधी आज 9 जून रोजी सायंकाळी होत असून त्यात ना.रामदास आठवले यांच्या नावाचा समावेश निश्चित झाल्यानंतर आज नाविदिल्लीतील त्यांच्या 11सफदर जंग रोड निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.यावेळी बौध्द भिक्खू ही उपस्थित होते.शपथविधी ला रवाना होण्या पूर्वी ना.रामदास आठवले यांनी सहकुटुंब नवी दिल्लीतील निवासस्थानी भिक्खू संघाच्या उपस्थितीत सामूहिक बुद्धपुजा केली. बंगल्याच्या प्रांगणात तथागत भगवान बुद्धांची मूर्ती आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प वाहून ना.रामदास आठवलेंनी अभिवादन केले. तसेच निवासस्थानी ना.रामदास आठवले यांनी त्यांच्या मातोश्री दिवंगत हौसा आई आठवले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी ना.रामदास आठवले यांच्या समवेत सौ सीमाताई आठवले आणि जित आठवले पूज्य भदंत डॉ राहुल बोधी महाथेरो; घनश्याम चिरणकर आदींनी बद्धपुजा केली. रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर , सुरेश बार्शिंग, रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे ;युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे, संजय डोळसे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.