जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर आंदोलन – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.29-भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याची अक्षम्य घोडचुक करणाऱ्या स्टंटबाज जितेद्र आव्हाड यांचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज मुंबईत चैत्यभुमी येथे जितेंद्र आव्हाड यांचा फोटो जाळुन तिव्र निषेध करण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांचे कृत्य माफ करण्यासारखे नसुन त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ; यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तिव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज दिली. मुंबई चैत्यभुमी येथे आज दुपारी 12 वाजता रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश च्या वतीने स्टंटबाज जितेद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ तिव्र निषेध आंदोलन करण्यात आले. रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांच्या नेतृत्वात जितेद्र आव्हाड यांचे फोटो जाळण्याचे निषेध आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश माहातेकर,राज्य सरचिटणीस गौतम सोनावणे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे,महिला आघाडी मुंबई अध्यक्ष उषाताई रामळू,जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे, रमेश गायकवाड; संजय पवार,साधु कटके,हरिहर यादव ;सोना कांबळे,रवि गायकवाड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
