संजय राऊत यांचे आरोप बिनबुडाचे असून महायुती मध्ये एकजूट आहे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.27 – महायुती मजबूत आहे. महायुती मध्ये एकजूट आहे.संजय राऊत मात्र मुद्दाम संभ्रम निर्माण करण्यासाठी बेछूट कपोलकल्पित आरोप करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील संजय राऊत यांनी केलेले आरोप पूर्ण खोटे आणि चुकीचे आहेत.असे मत आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवलेंनी व्यक्त केले.प्रधानमंत्री मोदी गृहमंत्री अमित शहा आणि उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत संजय राऊत यांनी उधळलेली मुक्ताफळे अत्यंत चुकीची खोटे आरोप केलेले असून संजय राऊत यांचे वक्तव्य चुकीचे निषेधार्ह आहे असे ही ना. रामदास आठवले म्हणाले.केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे चांगले लोकप्रिय ज्येष्ठ नेते कार्यकर्ते आहेत.ते चांगले काम करतात. त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा प्रयत्न भाजप रिपाइं महायुती ने केला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना रसद पुरवली हा त्यांच्यावरील आरोप बिनबुडाचा आणि मुद्दाम संभ्रम निर्माण करण्यासाठी संजय राऊत यांनी केलं आहे.या आरोपाचा आम्ही निषेध करतो .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि रिपब्लिकन पक्षासह सर्व महायुती नेत्यांनी महाविकास आघाडीला पराभूत करण्याचा एकजुटीने प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेला आरोप हा अत्यंत निषेधार्ह खोटा आरोप आहे. अजितदादा यांच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केल्याचा संजय राऊत यांचा आरोप निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादा पवार यांचे आणि भाजप चे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला आहे.महायुती चे सर्व घटकपक्षांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व महायुती नेत्यांनी एकजुटीने प्रयत्न केले आहेत.त्यामुळे चुकीचे आरोप करून संजय राऊत यांनी संभ्रम निर्माण करू नये महायुती ही मजबूत आहे.महायुती मध्ये एकजूट आहे.संजय राऊत यांचे आरोप हे कारस्थानी आरोप आहेत.महायुती मध्ये असा कोणतेही कपटकारस्थान होत नाही सर्व महायुती मनापासून एकजूट आहे.लोकसभा निवडणुकीत महायुती चे सर्व घटकपक्ष एकजुटीने लढले असून त्याचा परिणाम म्हणून महायुतीचा महाराष्ट्रात मोठा विजय होईल असे ना. रामदास आठवलेंनी मत व्यक्त केले.