पॅंथर गंगाधर गाडे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे जाणते नेतृत्व हरपले- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दी ४- दलित पॅंथर पासून रिपब्लिकन पक्षा पर्यंत आंबेडकरी चळवळीत काम करणारे ज्येष्ठ नेते ,दलितांच्या गरिबांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारे झुंजार लढवय्ये नेते गंगाधर गाडे . त्यांच्या निधनाने आंबेडकरी जनतेचा जाणता नेता हरपला आहे अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवंगत गंगाधर गाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे . उद्या रविवार दि.5 मे रोजी दिवंगत गंगाधर गाडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असून त्यांच्या अंत्यविधीस ना. रामदास आठवले छत्रपती संभाजी नगर येथे उपस्थित राहणार आहेत. गंगाधर गाडे यांच्या निधनाची वार्ता कळल्यानंतर आपणास तीव्र दुःख झाल्याचे ना. रामदास आठवले यांनी सांगितले.ज्येष्ठ नेते गंगाधर गाडे हे उत्कृष्ट संघटक होते. दलितांच्या प्रश्नांवर गरीब झोपडपट्टीवासियांच्या प्रश्नावर ते लढत होते त्यांना काही वेळा आंदोलनात जेल मध्ये जावे लागले पण ते डगमगले नाहीत.ते लढत राहिले. ज्येष्ठ पँथर झुंजार रिपब्लिकन नेते गंगाधर गाडे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे अशी शोकभावना रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे .दिवंगत गंगाधर गाडे यांचे माझे स्नेहाचे आणि कौटुंबिक संबंध होते. दलित पॅंथर त्यानंतर भारतीय दलित पँथर त्यानंतर रिपब्लिकन चळवळ या मोठ्या कालखंडात त्याच्याशी आपले चांगले संबंध होते.आपल्या नेतृत्वात त्यांनी भारतीय दलीत पँथर त्यानंतर रिपब्लिकन पक्षात काम केला आहे. काही काळ महाराष्ट्र राज्याचे मंत्री पद गंगाधर गाडे यांना देण्याची संधी मला प्राप्त झाली होती असे सांगत ना रामदास आठवले यांनी दिवंगत गंगाधर गाडे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.भारतीय दलीत पँथर च्या काळात ज्या ज्या वेळेस औरंगाबादला आपण जात होतो त्या त्या वेळी आपण पँथर गंगाधर गाडे यांच्या घरी वास्तव्य केले होते अशी आठवण ना रामदास आठवलेंनी पाठवलेल्या शोकसंदेशात सांगितली आहे.