बिहारच्या लोकसभेच्या सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा एनडीएला पाठिंबा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

पटना दि. 24 – बिहार मध्ये लोकसभेच्या सर्व 40 जागांवर रिपब्लिकन पक्षाचा राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( एन डी ए ) पाठिंबा असल्याची घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवलेंनी पटना येथे केली. रिपब्लीकन पक्षाच्या बिहार राज्य कमिटी च्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बिहार राज्यात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभे न करता सर्व 40 जागांवर एन डी ए ल पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे ना रामदास आठवले यांनी आज जाहीर केले.बिहार मध्ये भाजप 17 जागा लढवत आहे.जनता दल युनायटेड 16 जागा लढवत आहेत.लोक जनशक्ती पक्ष 5 जागा लढवत आहे. जीवनराम मांझी यांचा हम पक्ष 1 जागा आणि केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाहा यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा पक्ष 1 जागा असे एकूण 40 जागांवर एन डी ए लढत आहे.या राष्ट्रीय लोकशाही आघाडी एन डी ए ला बिहार मधील सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा देण्यात आला असल्याचे ना रामदास आठवलेंनी आज अधिकृत जाहीर केले.मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बिहार मध्ये 40 पैकी 39 जागा एन डी ए ने जिंकल्या होत्या. यंदा मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बिहार च्या लोकसभेच्या सर्व 40 जागा निश्चित एन डी ए जिंकेल असा विश्वास ना रामदास आठवलेंनी व्यक्त केला.काँग्रेस च्या इंडि आघाडीवर करेल प्रहार ते राज्य आहे बिहार असे यावेळी ना. रामदास आठवले म्हणाले.भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्धगया बिहार मध्ये आहे. त्यामुळे बिहार हे आमच्या बुद्ध विहार आहे. बिहार राज्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पायाभूत सुविधांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी केंद्र सरकार ने दिला आहे. बिहार चा विकास केला जात आहे. बिहार च्या सर्वांगीण विकासा साठी एन डी ए चा विजय निश्चित असल्याचा विश्वास ना रामदास आठवलेंनी व्यक्त केला.