राजकीय

लोकसभा निवडणुकीत राजस्थानच्या 25 जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजप ला पाठिंबा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची घोषणा

मुंबई दि.15- प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास झाला आहे.पुढील 5 वर्षात भारत देशाचा पूर्ण विकास करुन अर्थव्यवस्था विश्वात तीसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी भारत देशाला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी पुन्हा एकदा भाजप एन. डी. ए. ला विजयी केले पाहिजे.नरेंद्र मोदिंना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री केले पाहिजे.त्यासाठी राजस्थानच्या सर्व च्या सर्व 25 जागांवर भाजपला विजय मिळवून दिला पाहिजे. लोकसभेच्या राजस्थानच्या सर्व 25 जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजप ल पाठिंबा देत असल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज जयपुर येथे केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आज राजस्थानचे गुलाबी शहर जयपूर येथे जगतपुरा रोड येथे रिपब्लिकन पक्षाच्या राजस्थानच्या राज्य कार्यकारणीच्या कोअर कमिटी ची बैठक आज ना.रामदास आठवले यांच्या उपस्थित घेण्यात झाली.यावेळी राजस्थान मध्ये लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा एकही उमेदवार उभा न करता सर्व 25 जागांवर भाजपा ला पाठिंबा देण्याचा निर्णय सर्व संमतीने घेण्यात आला.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते नवरत्न गोसाईवाल यांची रिपब्लिकन पक्षाच्या राजस्थान राज्य कार्यअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.यावेळी लोकजनशक्ती पक्षाचे कमलेश भार्गव यांनी लोजपा सोडुन रिपब्लिकन पक्षात जाहिर प्रवेश केला.त्यांची रिपाइं च्या राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा ना.रामदास आठवले यांनी केली.

राजस्थान हे बहुतांश वाळवंट असणारा प्रदेश आहे.येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे.वर्षोनु वर्ष पुरेशा पाण्या वाचुन तहानलेल्या राजस्थानची समस्या ओळखून मोदी सरकारच्या आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या काळात राजस्थानची तहान भागवण्यासाठी मध्यप्रदेश आणि हरियाणा राज्यांशी राजस्थानचा करार करून मध्यप्रदेश आणि हरियाणाचे पाणी राजस्थानला देण्याचा करार झालेला आहे.मोदींनी 10 वर्षाच्या काळात राजस्थानला भरीव निधी देऊन राजस्थानचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाच करिष्मा असा आहे की राजस्थानच्या वाळवंटात ही भाजप चे कमळ फुलणार आहे. राजस्थानच्या वाळवंटात विकासाची गंगा आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने भाजप ला पाठिंबा दिला आहे असे ना.रामदास आठवले यांनी आज सांगीतले.या वेळी रिपब्लिकन पक्षाचे राजस्थानचे अधयक्ष राधामोहन सैनी आणि एड.नितीन शर्मा आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते. भारताचे पहिले कायदा मंत्री महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर दलित सामजातील ज्येष्ठ नेते आणि बिकानेर चे खासदार अर्जुन राम मेघवाल यांना कायदा मंत्री पदाचा स्वतंत्र कार्यभार मिळालेला आहे.अनेक वर्षाच्या कालखंडानंतर प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात दलित समाजातील नेत्याला कायदे मंत्री पदाचा स्वतंत्र प्रभार मिळाला आहे,असे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.मुंबई ते दिल्ली असा रस्ते माहामार्ग तयार होत असून मुंबई जयपुर मार्गे दिल्ली ला अवघ्या 12 तासांत पोहोचता येईल.रस्ते आणि विमानतळ चांगली बांधली जात आहेत.जागतीक दर्जाच्या दळण-वळण सुविधा देशात उभ्या राहत आहेत.त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात या लोकसभा निवडणुकीत 400 पार चा नारा जनता यशस्वी करेल असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

Star Maharashtra

Star Maharashtra या न्यूज वेबसाईटवर प्रसिद्ध होणाऱ्या मजकूर, बातम्या, जाहिराती, व्हिडिओ, फोटो यातील मतांशी संपादक / वेबसाईट संचालक सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!